नवी दिल्ली : काँग्रेसनं आज महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्यावर देशभरात आंदोलन केलं. काँग्रेसनं आज राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी आंदोलन जाहीर केलं होतं. दिल्ली पोलिसांनी प्रियांका गांधी वाड्रा आणि अन्य काँग्रेस नेत्यांना दिल्लीतील पक्ष कार्यालयाच्या बाहेर दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी प्रियांका गांधी यांनी भर रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं. प्रियांका गांधी यांना महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलं. यावेळी देखील प्रियांका गांधी यांनी संघर्ष केला. प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. प्रियांका गांधी रस्त्यावर ज्याप्रमाणं ठिय्या मारुन बसल्या होत्या तसाच राहुल गांधी यांचा देखील एक फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.