राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये संमिश्र निकाल

0
21

मुंबई : राज्यातील 238 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे आज निकाल लागले. त्यामध्ये काही ठिकाणी समिश्र निकाल लागले तर काही ठिकाणी पक्षांना निर्विवाद यश मिळाले. राज्य निवडणूक आयोगाने 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची जून महिन्यात घोषणा केली होती. त्यातील 33 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अशंत: बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे गुरुवारी प्रत्यक्षात 238 ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं होतं.

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील तांदळी ग्रामपंचायतीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मच्छिंद्र गदादे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाष कळसकर यांनी 10 विरुद्ध 1 अशा फरकाने विजय मिळवला. त्यांनी भाजपच्या पॅनेलचा एकतर्फी पराभव केला. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील लोणीकंद ग्रामपंचायतीवर भाजपच्या प्रदीप कंद यांनी 17 विरुद्ध 0 शुन्य असा एकतर्फी विजय मिळवलाय. राष्ट्रवादीचे शिरूर विधानसभा मतदारसंघातील आमदार अशोक पवार यांच्यासाठी हा धक्का आहे.

सोलापूरमध्ये भाजपचं वर्चस्व
सोलापूर जिल्ह्यात एकूण 25 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आलेत. यामध्ये भाजपने मुसंडी मारत 9 ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवाला आहे. तर सत्तेत सहभागी झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या समर्थक गटाला केवळ 1 जागावर समाधान मानवं लागलं. मात्र उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी आपला करिष्मा कायम ठेवत 4 ग्रामपंचायती आपल्या ताब्यात मिळवल्यात. या निवडणुकात जनतेने 7 ठिकाणी स्थानिक आघाडीकडे आपल्या ग्रामपंचायतिचा कारभार हाती दिलाय. काँग्रेसचा गड राहिलेल्या सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याचे चित्र आहे.

उस्मानाबाद जिल्हा ग्रामपंचायतीचा निकाल
तुळजापूर तालुका
कामठा – सर्वपक्षीय विजयी, भाजप पराभूत
दिपकनगर – स्थानिक आघाडी विजयी

उमरगा तालुका
तुगांव – शिवसेना विजयी – काँग्रेस पराभूत
अंबरनगर – बिनविरोध
कोरेगाव – शिवसेना
कोरेगाववाडी – शिवसेना विजयी – काँग्रेस पराभूत
कसगी – शिवसेना विजयी – काँग्रेस पराभूत

लोहारा तालुका
चिंचोली – स्थानिक आघाडी विजयी
खेड – स्थानिक आघाडी विजयी

कळंब तालुका
दाभा – भाजप विजयी – महाविकास आघाडी पराभूत

वाशी तालुका
सोनेगाव – शिंदे गट विजयी – भाजप पराभूत

जिल्हा- उस्मानाबाद
एकुण ग्रामपंचायत- 11
शिवसेना- 04
भाजप- 01
शिंदे गट- 01
राष्ट्रवादी-
काँग्रेस-
इतर – 05 ( स्थानिक आघाडी )