मुंबई : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना आणखी एक मोठा झटका दिला आहे. कोल्हापूर पोलिसांना वकील गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा दिला आहे. मराठा समाजाबद्दल जातीय द्वेष निर्माण केल्याबद्दल कोल्हापूर शाहुपुरीत गुन्हा दाखल झाला आहे. कोल्हापूर पोलिस थोड्याच वेळात आर्थर रोड कारागृहाकडे रवाना होणार आहे.
अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची मालिका सुरुच आहे. अकोला पोलिसांकडून देखील ताब्यासाठी अर्ज, मात्र जोपर्यंत आरोपीला न्यायालयीन कोठडीत जात नाही तोपर्यंत ताबा मिळणार नाही. अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची मालिका सुरुच आहे. मुंबई, सातारा, कोल्हापूर, अकोल्यानंतर आता सोलापुरातही गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.