विमानसेवेबाबत सोलापूरकर व्यक्त करणार जाहीर नाराजी

0
48

येस न्युज मराठी नेटवर्क : आज सोलापूरचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त हरीष बैजल यांची सोलापुर विकास मंच, वेक अप सोलापुर फौंडेशन, गिरीकर्णिका फौडेशनच्या संयुक्त शिष्टमंडळाने सोलापुरच्या होटगी रोड येथील विमानसेवा सामान्य नागरिक साठी तातडीने सुरू करावी यासंदर्भात सविस्तर भेट घेतली.

सोलापुरची होटगी रोड येथील विमानसेवा ही फक्त ठराविक VVIP च्या लोकांसाठी सध्या सुरु आहे. सदर विमानसेवा ही सोलापुरातील सामान्य नागरिक, उद्योजक.व्यापारी, नोकरदार, अशा सर्वासाठी सुरू असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी वरील सर्व संघटना हे गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा करीत आहेत.

पण सोलापुरच्यामहानगरपालिका प्रशासन कडुन विमानसेवा सेवा सुरू करण्याचा निर्णय न घेतल्याने सामान्य जनता या सेवेपासुन वंचित रहात आहे. यामुळे सामान्य जनतेच्या मनात याबाबत प्रंचड मोठा असंतोष, नाराजी, खदखद दिसत आहे सदर जनतेची याबाबतची असलेली नाराजी, असंतोष , खदखद व्यक्त करण्यासाठी शुक्रवार दिनांक २२/४/२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजता सोलापुर येथील होटगी रोड येथे प्रशासनाच्या विरोधात प्रतिक्रात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सदर या प्रतिकात्मक कार्यक्रम ची सविस्तर माहिती आज शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांना समक्ष भेटुन दिली तसेच या सर्व होटगी रोड येथील विमानसेवा सुरू करण्यासाठी असलेल्या अडथळे बाबत शिष्टमंडळाने माहिती विषद केली. आयुक्तांनी शिष्टमंडळाच्या सर्व गोष्टी अत्यंत शांत पद्धतीने ऐकुन घेतल्या, तसेच सोलापुरच्या प्रगती साठी आपण कायम प्रयत्नशील आहोत हे शिष्टमंडळास आश्वासित केले, याबद्दल शिष्टमंडळाने त्यांचे आभार व्यक्त केले.

सदर शिष्टमंडळात इंजि मिलिंद भोसले, विजय जाधव, डाॅ सुभाष वैकुंठे, डाॅ सुरेश खमितकर, प्रा रमेश माळवे, आंनद पाटील या मान्यवरांचा समावेश होता.