येस न्युज मराठी नेटवर्क : मानसशास्त्रानुसार, तुमच्या आत्मसन्मानाची पातळी तुमच्या आनंदाची पातळी ठरवते. आत्मसन्मानाची व्याख्या तुम्ही स्वत:ला किती आवडता यावरून केली जाते. तुमचा आत्मसन्मान हा तुमच्या आत्मप्रतिमेने ठरवला जाताे.तुम्ही तुमच्या इतरांबराेबरच्या दैनंदिन देवाणघेवाणीतून स्वत:कडे कसे बघता आणि स्वत:बद्दल जाे विचार करता ती तुमची आत्मप्रतिमा असते. तुमची आत्मप्रतिमा ही तुमच्या स्वआदर्शाने ठरत असते. तुमचा स्वआदर्श हा तुमचे सद्गुण, मूल्ये, ध्येय, आशा, स्वप्ने आणि आकांक्षा यांनी बनलेला असताे. मानसशास्त्रज्ञांनी असा शाेध लावला आहे : तुम्हाला तुमचे आदर्श वागणे जसे असावे असे वाटते, त्याच्याशी तुमचे या क्षणीचे वागणे हे जितके सुसंगत असेल तितके तुम्ही स्वत:ला जास्त आवडता, स्वत:चा आदर करता आणि जास्त आनंदी असता. जेव्हा तुम्ही तुमच्या सर्वाेत्कृष्ट वागणुकीच्या आदर्शाशी विसंगत असे वागता, तेव्हा तुम्ही नकारात्मक आत्मप्रतिमा अनुभवता. तुम्हीला तुमच्या सर्वाे त्कृष्ट पातळीपेक्षा खालच्या पातळीवरची- तुम्हाला खराेखर जे करण्याची आकांक्षा आहे, त्यापेक्षा खालच्या स्तरावरती कामगिरी करत आहाेत, असे वाटते. याचा परिणाम म्हणून तुमचा आत्मसन्मान आणि आनंदाची पातळी कमी हाेते.
स्वत:चे दाेष स्वीकारणे आणि लपवणे यातील फरक : आपण सगळेच स्पेशल आहाेत, युनिक आहाेत पण ह्या पाेटी कधी कधी आपल्याला एखादी गाेष्ट येत नसेल, जमत नसेल तर ती चक्क लपवली जाते. एवढ्या तेवढ्या कारणाने त्रास हाेईल म्हणून मुलांना अजिबात ओरडले किंवा रागावले जात नाही ह्यामुळे मुलांना आणि माेठ्यांना काय दाेष स्वीकारून, त्यात सुधारणा करण्याऐवजी ते दाेष लपवणे, काम पुढे ढकलणे किंवा चक्क आळस करणे, वर त्याचे समर्थन करणे अशा अत्यंत चुकीच्या सवयी लागत आहेत.
स्वत:ला फसवू नका : स्वत:ला इतरांपेक्षा प्रत्येक बाबतीत जास्त महत्त्व देणे, स्वत:चं मत सतत रेटत राहणे, आपण फारच सुंदर आहाेत असं फसवं आणि वरवरचं स्वत:ला सांगत राहणे यानं आत्मविश्वास वाढत नसताे.सेल्फ हेल्पची पुस्तकं ऐकून किंवा लेक्चर्स ऐकून काहीही हाेत नाही. मुद्दा असताे स्वत:ला गुणदाेषांसह स्वीकारण्याचा.आपण म्हणताे तीच पूर्व दिशा हा हट्ट जर राहिला तर तुम्ही अजिबात पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे वेळीच तुमचा नार्सिसस हाेणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.