येस न्युज मराठी नेटवर्क : दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील ग्रामदैवत श्री शिवयोगी महासिध्द यात्रा कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाही रद्द केल्याची माहिती मंद्रुपचे अप्पर तहसिलदार राजशेखर लिंबारे तसेच मंद्रुप पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ नितीन थेटे यांनी दिली.
श्री शिवयोगी महासिध्द यात्रेनिमित्त मंद्रुप पोलिस ठाण्यात गावकरीसमवेत महत्त्वाची बैठक संपन्न झाली, या बैठकीत अप्पर तहसिलदार राजशेखर लिंबारे तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ नितीन थेटे यांनी मार्गदर्शन केले.
भंडारकवठे येथे दरवर्षी माघ पौर्णिमेला ग्रामदैवत श्री शिवयोगी महासिध्द देवाची यात्रा भरते, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील भाविक शेतकऱ्यांची भाकणुक पाहण्यासाठी अलोट गर्दी असते, मागील दोन वर्षापासून कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करुन फक्त धार्मिक विधींना परवानगी दिली आहे तरी भाविकांनी यात्रेसाठी भंडारकवठे गावात गर्दी करु नये असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
या महत्त्वाच्या बैठकीत बाजार सामितीचे संचालक वसंत पाटील. पंचायत समितीचे माजी सदस्य विठ्ठल पाटील, सरपंच चिदानंद कोटगोंडे पोलिस पाटील अशोक मुक्काणे.महासिध्द पुजारी. भागवत बिराजदार, रमेश मुक्काणे. गुरुबसय्या स्वामी,शिवानंद हत्ताळे आदींची यावेळी उपस्थिती होती .