मुंबई : माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पुणे येथील भोसरी जमीन खरेदी प्रकरणात खडसे हे आरोपी आहेत. याच प्रकरणात त्यांना जामीन मिळाला आहे.
मंदाकिनी खडसे यांना दिलासा : यापूर्वी न्यायालयाकडून मंदाकिनी खडसे यांनादेखील दिलासा मिळालेला आहे. मंदाकिनी खडसे यांची 19 ऑक्टोबर रोजी ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. पुण्यातील भोसरी जमीन कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने मंदाकिनी खडसेंना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.