सोलापूर : शिवसूर्य प्रतिष्ठान सोलापूरच्या वतीने रक्षाबंधन राखी पौर्णिमाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत नेहरूनगर येथील गरीब वस्तीतील मुलांसोबत राखीपौर्णिमा साजरा करण्यात आले.
सदर कार्यक्रम साजरा करताना वस्तीतील मुलां-मुलीमध्ये एक वेगळा आनंद अनुभवास आला. हा कार्यक्रम अतिशय उत्साही वातावरणात सर्वांच्या सहकार्याने पार पडला.
यावेळी प्रार्थना फाऊंडेशनचे सचिव अनुताई प्रसाद मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिवसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कार्तिक अनागुंडे,ओंकार हिरेहब्बू, सागर जकापुरे, संकेत कोळी, शिवशक्ती उटगे, आकाश हारकुड,प्रसाद गवई, प्रणव पाटील, यश धोत्रे, आदित्य माने, आदित्य आनागुंडे, शंतनू जाकनाईक, प्रल्हाद गवई, सिद्धांत धोत्रे, शुभम गौर, ओंकार हत्ती यांची उपस्थिती होती.
