• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

हलसगीकर यांच्या कवितेने समाजमन संस्कारित – प्रा. मिलिंद जोशी

Yes News Marathi by Yes News Marathi
August 1, 2021
in इतर घडामोडी
0
हलसगीकर यांच्या कवितेने समाजमन संस्कारित  – प्रा. मिलिंद जोशी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि.३१ – जीवनातल्या सात्त्विकतेचा शोध घेणाऱ्या दत्ता हलसगीकर यांच्या कवितेने समाजमन संस्कारित केले असे मत महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. राजसत्ता ही ज्ञानसत्तेच्या सोबत असण्याचा काळ बदलत चालला आहे. आता राजसत्ता ही धर्मसत्तेकडे झूकत चालली आहे. या काळात खऱ्या अर्थाने कवीचे सृजन समाजाला दिलासा देऊ शकते. कारण कविता ही सार्वभौम असते. समाज याच पध्दतीच्या कविता लिहीणाऱ्या सत्वशील कवींच्या शोधात असल्याचे अभ्यासपूर्ण मत व्यक्त करताना प्रा.जोशी म्हणाले .

जुळे सोलापुरातील इंडियन मॉडेल स्कूलच्या प्रा. ए. डी. जोशी सभागृहात महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखा व प्रिसिजन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने स्व.दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्य राज्यस्तरीय पूरस्कार ज्येष्ठ साहित्यिक आणि सोलापूर आकाशवाणीचे सहाय्यक संचालक सुनील शिनखेडे यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी प्रा.जोशी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रा. जोशी यांच्यासह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्रिसीजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, मसाप शाखेच्या कार्यध्यक्षा डॉ. सायली जोशी, पुरस्कारमुर्ती सुनील शिनखेडे, मसाप जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी स्नेहा शिनखेडे उपस्थित होते . प्रा.जोशी पुढे म्हणाले की हलसगीकर हे मानवतेचे संस्कार केलेले अंतर्बाह्य कवी होते. गहिवरणारा स्वर आणि आसवांनी डबडबलेले डोळे हीच त्यांची खरी ओळख होती. संवेदनशीलता बोथट होणे आणि अश्रू आटणे ही समाजाच्या ऱ्हास पर्वाची सुरुवात असते आजचा समाज त्याच दिशेने जातो आहे म्हणून हलसगीकरांच्या कवितेचे आणि व्यक्तिमत्त्वाचे स्मरण करणे गरजेचे आहे. यावेळी कुलगुरु डॉ. फडणवीस यांनी सांगितले की, सोलापुराच्या मातीचा परिचय विद्यापीठ गीतातून होतो. हे गीत कै. दत्ता हलसगीकर यांनी लिहिलेले आहे. शिक्षणातून शेवटी मानवता धर्माचाच पाया बळकट व्हावा असा आशय त्यामध्ये उमटला आहे.शिक्षणात सर्जनशीलता महत्त्वाची आहे. पुरस्कारा प्रति सुनील शिनखेडे यांनी या पुरस्काराबद्दल मसाप शाखा जुळे सोलापूर आणि प्रिसिजन फाऊंडेशनची कृतज्ञता व्यक्त केली . याप्रसंगी डिजिटल मीडिया महाराष्ट्र राज्य संपादक पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार राजा माने, राज्य कार्यकारिणीवर पद्माकर कुलकर्णी, सोलापूर जिल्ह्याच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शंकर जाधव, मानपत्राचे उत्कृष्ट लेखन केल्याबद्दल माधव देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी उपक्रमाबाबत मनोगत व्यक्त केले. माधव देशपांडे यांनी मानपत्र वाचन केले.

Previous Post

पूरग्रस्त दौर्‍यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्र्यांकडे 26 मागण्या

Next Post

टोकियो ऑलिम्पिक : एम्मा मॅककॉनने सात पदक जिंकली

Related Posts

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती
इतर घडामोडी

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

July 2, 2026
वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन
इतर घडामोडी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन

July 2, 2026
सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी
इतर घडामोडी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 2, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
इतर घडामोडी

आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

July 2, 2026
उजनी-भीमा नदी प्रदूषण : जनमानसाच्या जीवाशी हा खेळ का?
इतर घडामोडी

उजनी-भीमा नदी प्रदूषण : जनमानसाच्या जीवाशी हा खेळ का?

July 2, 2026
Next Post
टोकियो ऑलिम्पिक : एम्मा मॅककॉनने सात पदक जिंकली

टोकियो ऑलिम्पिक : एम्मा मॅककॉनने सात पदक जिंकली

ताज्या बातम्या

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

July 2, 2026
मुंबईत मोठी दुर्घटना..साकीनाक्यात २५ फूट खोल मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू!

मुंबईत मोठी दुर्घटना..साकीनाक्यात २५ फूट खोल मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू!

July 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026