इंडियातील ब्युटी इंडस्ट्री मधील सर्वात मोठी स्कूल समजल्या जाणाऱ्या एल टी ए अकॅडमीची सोलापुरात स्कूल सुरू करण्यात आली आहे. सोनल पांचाळ यांच्या स्टाइल मंत्रा स्टाइल मंत्रा च्या पुढाकाराने ही अकॅडमी सुरू झाली आहे. इंडियन मोडेल स्कूल च्या संचालिका सायली जोशी यांच्या शुभहस्ते या स्कूलचा शुभारंभ करण्यात आला .सात रस्ता जवळील मोदी गणपती जवळ स्टाईल मंत्राच्या जागेत ही अकॅडमी सुरू झाली आहे. यामुळे आता जगभरातील नामांकित CIDASCO, CT&GIL tasech bhartatil ABTC va itar विविध प्रकारचे नामांकित कोर्स करण्याची संधी सोलापूरातील युवतींना मिळाली आहे पुण्या-मुंबईत असणारी ही अकॅडमी सोलापुरात सुरू झाल्यामुळे सोलापुरातील महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन स्टाइल मंत्रा च्या सोनल पांचाळ यांनी केले आहे.
या शुभारंभप्रसंगी सायली जोशी यांनी सोनल पांचाळ त्यांचे आणि त्यांच्या स्टाईल मंत्राचे भरभरून कौतुक केले.आर जे श्रद्धा यांनीदेखील सोनल पांचाळ यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनेचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर ओझस शहा ,आरजे श्रद्धा ,तृप्ती झाड, आसावरी गांधी, डॉ. नयना व्यवहारे,विकास गोसावी, सचिन खानापुरे, स्नेहा पवार ,सचिन कानेकर आदी उपस्थित होते