सोलापूर : महापालिकेचा मंगळवार दिनांक १५ जूनचा covid-19 चा अहवाल प्राप्त झाला आहे. सोमवारी रात्री १२ वाजता संपलेल्या चोवीस तासात शहरात नवीन १४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या कालावधीत १६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दोघांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. कोरोनाची बाधा झालेले १७० रुग्ण अध्याप विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.









