मुंबई, दि. 15 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदुमिल येथील स्मारकाच्या कामाला गती देवून विहित कालावधीत या स्मारकाचे काम पूर्ण व्हावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदुमिल येथील स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासंदर्भात मंत्रालयातील दालनात दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक झाली.
यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त एस.व्ही.आर.श्रीनिवास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री मुंडे यांनी यावेळी कोरोना स्थितीमुळे प्रकल्पाच्या कामांचा मुळ कालावधी वाढला आहे. त्यामुळे स्मारकाच्या कामांना गती देवून ते विहित वेळेत पूर्ण करावे. स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी तसेच पुतळा प्रतिकृती अंतिम करण्यासंदर्भातील गठित समितीचे लवकरच पुर्नगठन करण्यात येईल, असेही मुंडे यांनी सांगितले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.










