सोलापूर – सोलापूर शहरात सध्या कोरोना कमी झाल्या मुळे शिथिलता देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सोलापूर शहरातील सर्व विडी कामगारांनी त्यांचे तपासणी करून घ्यावे अशी आव्हान करण्यात आले होते.त्याच अनुषंगाने आज महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या पुढाकाराने व नगरसेविका अनिता कोंडी यांच्या प्रभागात एमआयडीसी, कुमारस्वामी नगर येथे बत्तीन विडी कारखाना मध्ये त्या भागातील 225 विडी कामगारांचे अँटीजन टेस्ट करण्यात आले.त्यामध्ये कोणीही पॉझिटिव्ह आढळून आले नाही. त्या भागातील बत्तीन बिडी कारखाना, देसाई विडी कारखाना, संभाजी बिडी कारखाना, आप्पा ठाकूर बिडी कारखाना, सावदेकर बिडी कारखाना या भागातील बीड कामगारांनी याठिकाणी कोरोनासाठी तपासणी करण्यात आले होते.तसेच यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी या ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत नगरसेविका अनिता कोंडी, भाजपचे गंगाराम पाथरूड, अंबादास गादम, व्यंकटेश कोंडी तसेच भावना ऋषी हॉस्पिटलचे मंजुषा नक्का,सिस्टर ममता आदी मान्यवर उपस्थित होते.