येस न्युज मराठी नेटवर्क : प्र. क्र 24 च्या नगरसेविका अश्विनी चव्हाण यांच्या भांडवली निधीमधून कमला मधील फुलमामडी घर ते माने घरापर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता करण्यात आले, या रस्त्याचे उद्घाटन रुक्माई प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण चव्हाण,अभंगराव ,राजू चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
त्याचबरोबर निकंबे यांच्या घरापासून पवार घरापर्यंत ड्रेनेज लाईन चे उद्घाटन प्रा.श्री.मोहन राठोड,श्री.सुधाकर राठोड तसेच स्थानिक नागरिक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कमला नगर मधील नागरिकांनी नगरसेविका अश्विनी चव्हाण यांच्या कामांचे कौतुक करून धन्यवाद व्यक्त केले, आणि त्यांचा सत्कार करण्यात आले या विविध कामांच्या उद्घाटन प्रसंगी ठाकरे,निकंबे,संतोष कोरे, राठोड वहिनी, अभंगराव मामी.तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.