गिनीज बुक ऑफ रेकोर्डमध्ये नोंद होणार
दरबन: दक्षिण आफ्रिकेत एका महिलेने १० मुलांना जन्म दिला आहे. डॉक्टरांनी अधिकृतपणे याला दुजोरा दिल्यास हा एक विक्रम असणार आहे. एक महिन्यापूर्वीच माली देशातील महिलेने मोरक्कोमध्ये ९ मुलांना जन्म दिला होता. दक्षिण आफ्रिकेतील महिला गोसिअमे थमारा सितोले (वय ३७) या महिलेने १० मुलांना जन्म दिला आहे. यामध्ये सात मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे. सितोलेचे पती टेबोगो त्सोत्सीने सांगितले की, ७ जून रोजी प्रिटोरियन रुग्णालयात सिजेरियन शस्त्रक्रियेने प्रसुती झाली. या आफ्रिकन जोडप्याला याआधीच जुळे मुले आहेत. टेबोगो त्सोतेत्सी सध्या बेरोजगार आहेत. टेबोगो यांनी सांगितले की, मुलांच्या जन्मानंतर मी भावूक झालो असून आनंदी आहे.