नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने माजवलेला हाहाकार आणि तिसऱ्या लाटेची शक्यता यामुळे भारतातही लहान मुलांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. भारतात 2 ते 18 वर्षाच्या मुलांवरील कोरोना लसीच्या ट्रायलला मंजुरीही देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच लहान मुलांनाही लस देण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे.
भारत बायोटेक कंपनीला 2 ते 18 वर्षांच्या मुलांवर कोरोनाच्या लसीची ट्रायल करण्याची सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने शिफारस केली होती. त्याला मंगळवारी मंजुरी देण्यात आली आहे. ही क्लिनिकल ट्रा्यल 525 मुलांवर केली जाणार आहे. दिल्ली एम्स, पाटना एम्स आणि नागपूर एम्समध्ये ही ट्रायल होणार आहे. कमिटीच्या शिफारशीनुसार, भारत बायोटेकला फेज 3ची ट्रायल पूर्ण करण्यापूर्वी फेज 2 चा पूर्ण डेटा द्यावा लागणार आहे.