येस न्युज मराठी नेटवर्क : भावाच्या पोलीस कोठडीत वाढ होऊ नये म्हणून अमर पाटील यांनी खाजगी संप विशाल काटे यास 70 हजार रुपयांची लाच पोलिसांना देण्यासाठी दिली होती. अमर पाटील यांच्याकडे चार लाख रुपये लाच मागण्यात आली होती. त्यातील पहिला हप्ता म्हणून दोन लाख रुपये देण्याचे ठरले होते.त्यातील 70 हजार रुपये रोख विशाल काटे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वीकारले होते. विशाल काटे व त्याचे सहकारी MH 13 DE 42 80 मधुन पळुन गेल्यानंतर पोलिसांनी अमर पाटील याच्याविरुद्ध पंढरपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.