येत्या २१ मार्च रोजी राज्यात MPSC ची परीक्षा होणार असून यासाठी विद्यार्थ्यांनी PPE किट घालावे अशी तयारी शासनाने ठेवली आहे. सोलापूर शहर जिल्ह्यात ९ हजार ८६० विद्यार्थी ही परीक्षा देणार असून सकाळी आणि दुपारच्या सत्रात ही परीक्षा होणार असल्यामुळे PPE किटचे प्रत्येक विद्यार्थ्यामागे २ सेट ठेवले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना मास्क घालणे बंधनकारक आहे. परंतु PPE किटची सक्ती असणार नाही अशी माहिती सोलापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी दिली. परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. सोलापूरचा वाढत उन्हाळा आणि PPE किट तसेच मास्क यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच दमछाक होणार आहे.