सोलापूर : नाणार प्रकल्पाबाबत मांडलेल्या भूमिकेला शरद पवारांचा पाठिंबा आहे, असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी केला. शरद पवारांनी आपल्याला फोन करून भूमिका योग्य असल्याचे म्हटले आहे, असेही राज ठाकरे यांनी सांगितले. राज ठाकरे यांची नाणारवासियांनी सोमवारी भेट घेतली. या भेटीत नाणारवासियांसमोर राज ठाकरे यांनी हा दावा केला. शरद पवार मुख्यमंत्र्यांशी लवकरच यासंदर्भात भेट घेणार आहेत, असेही राज ठाकरे यांनी शिष्टमंडळाला सांगितले. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला भेटीसाठी वेळ दिली नाही तरी शरद पवारांना नक्की वेळ देतील, असा टोला राज यांनी यावेळी लगावला.