येस न्युज मराठी नेटवर्क : अयोध्या येथील राम मंदिराच्या बांधकामासाठी सोलापुरात चौपाड मध्ये राहणारे आणि मूळचे वैराग येथील असलेले सेवानिवृत्त मंडल अधिकारी चंद्रकांत यशवंत गोवर्धन यांनी आपले एक महिन्याचे सेवानिवृत्ती वेतन देणगीरूपाने राम मंदिराच्या बांधकामासाठी दिली आहे. त्यांनी सदरची रक्कम बँकेतून ऑनलाइन राम मंदिर न्यासा कडे पाठविली आहे आजवर त्यांनी अनेक वेळा आपली सेवा निवृत्तीची रक्कम गोरगरिबांना तसेच शेतकऱ्यांना देणगीरूपाने दान म्हणून दिली आहे.