येस न्युज मराठी नेटवर्क : कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन अजून आक्रमक करण्याचा निर्णय शेतकरी नेत्यांनी घेतला आहे. बुधवारी संयुक्त किसान मोर्चाची बैठक पार पडली. यावेळी शेतकरी आंदोलकांनी १८ फेब्रुवारीला देशव्यापी रेल रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी १२ ते ४ असे चार तास हे आंदोलन केले जाणार आहे. आंदोलनाचा भाग म्हणून आंदोलनकर्त्यांनी १२ फेब्रुवारीपासून राजस्थानाच्या रस्त्यांवरील सर्व टोल वसुली करु न देण्याचा निर्णय घेतला आहे.संयुक्त किसान मोर्चाने दिलेल्या माहितीनुसार, १४ फेब्रुवारीला देशभरात कॅण्डल मार्च आणि मशाल मोर्चा काढला जाणार आहे.