येस न्युज मराठी नेटवर्क : लोकमंगलचा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार यंदा विजयने चोरलेले दिवस या कादंबरीसाठी संतोष जगताप यांना, क्लोज एन्काऊंटर या ललित लेखनसाठी पुरुषोत्तम बर्डे यांना आणि सिनेमा पाहणारा माणूस या आत्मचरित्र साठी अशोक रणे यानाजाहिर झाला आहे. १५हजार रुपये रोख , स्मृती चिन्ह आणि सोलापुरी चादर असे पुरस्काराचे स्वरूप आहे.द्र.शिवाजी शिंदे यांना काव्यसंग्रहसाठी प्रोत्साहन पुरस्कार देण्यात येणार आहे.वितरण सोहळा लवकरच होणार असल्याचे लोकमंगल वाचनालयाचे अध्यक्ष दिनकर देशमुख यानि संगितले.










