येस न्युज मराठी नेटवर्क । काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळ राज्यातील त्यांच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेतला. या वेळी राहुल गांधी यांचा काहीसा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. राहुल गांधी यांनी प्रसिद्ध यूट्युब फूड चॅनल ‘व्हिलेज कुकींग’ सोबत मशरुम बिर्यणी बनविण्याचा आणि भोजनाचाही आनंद घेतला. या हटके अंदाजातील त्यांचा व्हिडिओही सोशल मीडियार जोरदार व्हायरल झाला आहे. राहुल गांधी यांच्यासोबतचा हा व्हिडिओ ‘विलेज कुकिंग’ टीमने त्यांच्या चॅनलवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ प्रसिद्ध होताच काही वेळातच तो सोशल मीडियात व्हायरल झाला.
