मुंबई : खातेवाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या खात्यांपेक्षा अधिक महत्त्वाची खाती भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. भाजपाकडे गेलेली खाती पाहता राज्यात खरी सत्ता भाजपाचीच असणार हे उघड आहे. निधी वाटपातले प्रमाण पाहता भाजपाकडे 80 टक्के आणि 20 टक्के शिंदे गटाकडे अशी विभागणी झाली आहे.
स्वांतत्र्यांच्या पूर्वसंध्येला बिगर खात्याचे मंत्री खात्याचे मंत्री झाले. पाच दिवस लांबलेले खाते वाटप झाले. मनावर मोठा दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना भाजपाने मुख्यमंत्रीपद दिले. खातेवाटपात मात्र सत्तेतला 80 टक्के वाटा भाजपाने स्वत:कडे घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार अशी आठ खाती आहेत.
राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
डॉ. विजयकुमार गावित – आदिवासी विकास
गिरीष महाजन – ग्राम विकास आणि वैद्यकीय शिक्षण
रविंद्र चव्हाण – सार्वजनिक, अन्न व नागरी पुरवठा
मंगलप्रभात लोढा – पर्यटन, महिला व बालविकास
सुधीर मुनगंटीवार – वन
चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण
सुरेश खाडे – कामगार
अतुल सावे – सहकार