सोलापूर : वीरशेव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने दि. २६ डिसेंबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे वीरशेव समाजातील सर्व पोटजातीच्या ७ व्य राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन केंद्रीय खते व रसायने मंत्री भगवंतजी गुरुबसप्पा खुबा यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी भगवंतजी गुरुबसप्पा खुबा यांची अपारंपारिक ऊर्जा विभाग आणि खते-रसायन विभाग राज्यमंत्री म्हणून केंद्रीय मंत्री मंडळात निवड झाल्याबद्दल वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानतर्फे सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती श्रीशैल बनशेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.