येस न्युज मराठी नेटवर्क : देशात गेल्या 24 तासात 2 लाख 58 हजार 89 कोरोना रुग्णांची नोंद झालीय. तर 1 लाख 51 हजार 740 जण कोरोनामुक्त झाले असून 385 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून आजतागायत मृतांचा आकडा 4 लाख 86 हजार 451 वर पोहोचलाय. देशातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या देखील वाढली असून 8 हजार 209वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात काल 8 ओमिक्रॉन बाधित रुग्णाची नोंद झालीय.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची स्थिती काय?
राज्यात रविवारी 41 हजार 327 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 29 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 40 हजार 386 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. तर राज्यात रविवारी 8 ओमिक्रॉनबाधितांची नोंद झालीय. महाराष्ट्रातील एकूण ओमिक्रॉन रुग्णांचा आकडा 1 हजार 738 वर पोहोचला आहे. त्यातले 932 रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहेत.