सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील जुळे सोलापूर , हद्दवाढ भागातील विविध मूलभूत सुविधांची कामे तात्काळ व्हावीत तसेच इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी विकासाचे व्हिजन असलेले स्वयंम शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक एड. सोमनाथ वैद्य यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
एड. सोमनाथ वैद्य हे आगामी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ संघातून निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी करीत आहेत. या मतदारसंघात शहरी व ग्रामीण भागात त्यांनी विविध सामाजिक उपक्रमाचा धडाका लावला आहे. या मतदारसंघाचा विकास करून येथील जनतेला सुखी, समाधानी ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. त्यामुळेच तेथील प्रश्न समस्या व आवश्यक योजनांची माहिती घेऊन त्यासाठी ते शासनाकडे पाठपुरावाही करीत आहेत.
दरम्यान, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील जुळे सोलापूर हद्दवाढ भागात साधारपणे २ लाख लोक राहत असून या भागात मुलभूत सोयीसुविधाची कामे अदयापही झाली नाहीत. विविध नगरातील रस्ते, ड्रेनेज, भुमिगत पाणी पाईपलाईन झालेली नसून यामुळे या परिसरातील लोकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथील सर्वसामान्य जनतेमध्ये सरकारबद्दल तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. टॅक्स भरूनही येथील लोकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे प्रचंड नाराजीचा सूर आहे. त्यामुळे महायुतीच्या विरोधात मतदान करुन महायुतीचा उमेदवार पराभूत करतील, अशी लोकांची भावना आहे. त्या सुविधा तत्काळ उपलब्ध होणे आवश्यक
असून कार्यवाही करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिका प्रशासनाला द्यावेत, असे निवेदनात म्हटले आहे.
सरपंच , उपसरपंचासह सदस्यांच्या मानधन वाढीच्या मागणीची पूर्तता !
सध्या सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना मिळणारे मानधन हे अनुक्रमे प्रति महिना 3 हजार , दीड हजार आहे. ते अत्यंत अल्प असून त्यात वाढ करण्याची गरज आहे. सरपंच यांना प्रति महिना 10 हजार रुपये तसेच उपसरपंच व सदस्य यांना 5 हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे ऍड. वैद्य यांनी निवेदनाद्वारे केली होती. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरपंच, उपसरपंच यांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला. याबद्दल एड. वैद्य यांनी आभार मानले आहेत.