येस न्युज मराठी नेटवर्क : दरवर्षी पावसाळ्यामध्ये सोलापूर शहरातील पांढरी वस्ती, अवंती नगर मडके वस्ती, वसंत विहार ,बाळे, देगाव या भागातील नागरिकांना हिप्परगा तलावातील अतिरिक्त पाण्यामुळे त्रास सहन करावा लागतो यावर्षी देखील तो धोका निर्माण झाला आहे. सोलापूर तुळजापूर रोडवर असलेल्या हिप्परगा तलावात सतत झालेल्या पावसामुळे तब्बल 90 टक्के पाणीसाठा झाला आहे त्यामुळे येत्या 24 तासात हा हिप्परगा तलाव शंभर टक्के भरणार असून अतिरिक्त झालेले पाणी हे हिप्परगा तलावातून सांडव्याद्वारे सोलापूर शहरातील बाळे ओढ्यात येते. हा ओढा शहरातील पांढरे वस्ती अवती नगर मडकी वस्ती वसंत विहार बाळे, देगाव कवठे, डोणगाव बेलाटी या मार्गावरून जात असल्याने या परिसरातील नागरिकांना या येणाऱ्या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले असून त्यानुसार महापालिकेच्या च्या अधिकाऱ्याने देखील याबाबत सतर्क केले आहे