• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुंबई विद्यापीठाने पटकाविले राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे विजेतेपद

admin by admin
December 30, 2019
in मुख्य बातमी
0
मुंबई विद्यापीठाने पटकाविले राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे विजेतेपद
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे आयोजित 23 वी राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद 250 गुणांसह मुंबई विद्यापीठ, मुंबईच्या संघाने पटकाविले. तर सर्वसाधारण उपविजेतेपद 170 गुणांसह शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरला मिळाले. सोमवारी पारितोषिक वितरणाने महोत्सवाचा समारोप झाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमास कुलपती नियुक्त निरीक्षण समितीचे समन्वयक डॉ. दीपक माने, वित्त समितीचे समन्वयक डॉ. गोविंद कतलाकुटे, प्रभारी प्र कुलगुरू डॉ. विकास कदम, कुलसचिव डॉ. विकास घुटे, कुलपती नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. महेश माने, तज्ज्ञ संचालक डॉ. प्रदीप देशमुख, आंतरराष्ट्रीय हँडबाल खेळाडू श्रेयस मालप, वित्त व लेखाधिकारी श्रेणीक शाह यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक व स्वागत क्रीडा संचालक डॉ. एस. के. पवार यांनी केले.

या क्रीडा महोत्सवातील मुलांचे सर्वसाधारण विजेतेपद 110 गुणांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादच्या संघाने पटकाविला. तर उपविजेतेपद मुंबई विद्यापीठ, मुंबईला मिळाले. मुलींचे सर्वसाधारण विजेतेपद 160 गुणांसह मुंबई विद्यापीठ, मुंबईच्या संघाने पटकाविले. तर उपविजेतेपद शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरला मिळाले. त्याचबरोबर बास्केटबॉल मुलांचे विजेतेपद मुंबई विद्यापीठ, बास्केटबॉल मुलींचे विजेतेपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कबड्डी मुलांचे विजेतेपद शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरने तर मुलींचे विजेतेपद एस एन डी टी महिला विद्यापीठ, मुंबईने पटकाविले. खो खो मुलांचे विजेतेपद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद व मुलींचे विजेतेपद मुंबई विद्यापीठ, मुंबईला मिळाले. व्हॉलीबॉल मुलांचे विजेतेपद राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ व मुलींचे विजेतेपद मुंबई विद्यापीठ, मुंबईला मिळाले आहे.

हँडबाल मुले व मुलींचे विजेतेपद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास मिळाले आहे. अथलेटिक्स मुलांचे विजेतेपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास तर मुलींचे विजेतेपद शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरला मिळाले आहे.

यावेळी सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी विजेत्यांचे अभिनंदन करून खेळांत उत्कृष्ट करियर करण्याचे आवाहन केले.

कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी एकही क्रीडांगण नसताना 15 क्रीडांगणे तयार करून आज महोत्सव यशस्वी झाल्याने आनंद व्यक्त केला. काहींनी महोत्सव यशस्वी होणार नसल्याची भीती व्यक्त केली होती, मात्र आमच्या टीममुळे महोत्सव चांगल्या प्रकारे यशस्वी झाले आहे, याचा खूप आनंद आहे.

या कार्यक्रमात क्रीडा महोत्सवासाठी देणगी दिलेल्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वेता मालप यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी मानले.

Previous Post

अजित पवार यांनाच मिळाले उपमुख्यमंत्रीपद, ‘हे’ ३५ आमदार होणार मंत्री

Next Post

एम. आय.टी. / विश्वशांती गुरुकुल मध्ये ४५ वे विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण संपन्न

Related Posts

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
Next Post
एम. आय.टी. / विश्वशांती गुरुकुल मध्ये ४५ वे विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण संपन्न

एम. आय.टी. / विश्वशांती गुरुकुल मध्ये ४५ वे विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण संपन्न

ताज्या बातम्या

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

August 23, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026