• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अहिल्यादेवी होळकरांचा लोककल्याणकारी इतिहास जगासमोर यावा

Yes News Marathi by Yes News Marathi
May 31, 2024
in इतर घडामोडी
0
अहिल्यादेवी होळकरांचा लोककल्याणकारी इतिहास जगासमोर यावा
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर विद्यापीठातील कार्यक्रमात ‘जेएनयू’चे डॉ. उमेश कदम यांची अपेक्षा

सोलापूर – मध्ययुगीन इतिहास काळात एक उच्च कोटीच्या प्रशासक राहिलेल्या रणरागिणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणकारी महान कार्य करत आदर्श राज्यकारभार सांभाळला. त्यांची प्रसिद्ध युद्धनीती, आदर्श न्यायदान पद्धत, प्रजेबद्दल राहिलेली आस्था, मंदिरांचा केलेला जीर्णोद्धार त्याचबरोबर त्यांनी केलेल्या महान कार्याचा इतिहास जगासमोर यावा, अशी अपेक्षा जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली येथील वरिष्ठ इतिहास प्राध्यापक डॉ. उमेश कदम यांनी व्यक्त केली.

शुक्रवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्यावतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात डॉ. कदम हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर होते. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांची उपस्थिती होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी प्रास्ताविक व स्वागत करत मान्यवरांचा परिचय करून दिला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यावार्ता अंकाचे तसेच चिन्मयी मुळे लिखित क्वीन ऑफ इंडोमिटॅबल स्पिरिट या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्याचबरोबर यावेळी यूपीएससी परीक्षेत यश संपादन केलेली स्वाती राठोड, जागतिक पातळीवर कराटे स्पर्धेत विशेष प्राविण्य प्राप्त केलेली भुवनेश्वरी जाधव आणि राष्ट्रीय पातळीवर सांस्कृतिक स्पर्धेत यश संपादन केलेली तेजस्विनी केंद्रे या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.

डॉ. कदम म्हणाले की, मध्ययुगीन काळात संपूर्ण भारताला एकत्र जोडलेले राज्य हे महाराष्ट्र होते. मराठा साम्राज्याचा इतिहास, होळकरशाही या सर्वांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य व त्यांनी केलेला संघर्ष वाखाणण्याजोगे आहे. सर्व कल्याणकारी लोकतंत्र जननी होण्याचा मान त्यांना मिळविला. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राने त्यांचे कार्य हे संशोधनाच्या माध्यमातून एकत्रित करीत भारताबाहेर जगासमोर नेण्याचा प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

कुलगुरू प्रा. महानवर म्हणाले की, आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येत आहेत. महापुरुषांचा जाज्वल इतिहास व त्यांचे कार्य आजच्या पिढीसमोर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. येथील विद्यार्थी आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. यापुढे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य विद्यापीठाच्या माध्यमातून परदेशात पोहोचण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू. विद्यापीठाची गुणवत्ता सिद्ध करताना ‘क्यू एस’ जागतिक मानांकन मिळवण्यासाठी निश्चित सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. बक्षिसाचे अभिवाचन सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती माशाळे व डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार डॉ. काळवणे यांनी मानले.

Previous Post

मोदी स्टंटबाज आहेत, यावेळी पंतप्रधान होणार नाहीत : प्रकाश आंबेडकर

Next Post

पोलीस आयुक्तालयातील ०४ अधिकारी अन् २१ पोलीस कर्मचारी सेवानिवृत्त; आयुक्तांनी दिल्या शुभेच्छा

Related Posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026
पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !
इतर घडामोडी

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

October 3, 2026
पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !
इतर घडामोडी

पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !

October 3, 2026
निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली
इतर घडामोडी

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम
इतर घडामोडी

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026
निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक
इतर घडामोडी

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

October 2, 2026
Next Post
पोलीस आयुक्तालयातील ०४ अधिकारी अन् २१ पोलीस कर्मचारी सेवानिवृत्त; आयुक्तांनी दिल्या शुभेच्छा

पोलीस आयुक्तालयातील ०४ अधिकारी अन् २१ पोलीस कर्मचारी सेवानिवृत्त; आयुक्तांनी दिल्या शुभेच्छा

ताज्या बातम्या

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

October 3, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026
पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

October 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026