पुणे – योग ही आपली परंपरा, संस्कृती, आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. ही चिकित्सा पद्धती असून भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी, स्वस्थ समाजाची निर्मिती व्हावी असा प्रयत्न सर्व मिळून करूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमात केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ तसेच उपस्थित मान्यवर व वारकरी यांच्याकडून योग प्रशिक्षक डॉ. पल्लवी कव्हाणे यांच्या पथकाने योगाभ्यास करवून घेतला. विविध योगासने व प्राणायाम यावेळी करण्यात आले.



यावेळी संत साहित्याचे अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, विठ्ठल रुख्मिणी संस्थान पंढरपूरचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम, क्रीडा संचालक शीतल तेली उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेचे सदस्य राजेश पांडे आदी उपस्थित होते.
जागतिकयोगदिनच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी आणि श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
#yesnewsmarathi #SolapurNews #MaharashtraNews #MarathiNews #ashadhiwari2025 #DevendraFadnavis #murlidharmohol #YogaForOneEarthOneHealth #YogaDay2025 #YogaForAll