मोहोळ तालुक्यतील येणकी येथे ग्रामदैवत जकराया महाराजांची यात्रा 6 एप्रिल पासून सुरु झाली. यात्रेमुळे येणकी ग्रामस्थामध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसत होते. तीन दिवस चालणार्या या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गुरुवारी सकाळी मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर येथून बिरोबा व हुलजंती येथून महालिंगराया यांच्या पालख्यांचे आगमन येणकी येथे सकाळी झाले. दिवसभर अंबिल दाखविण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास या दोन्ही पालख्या माजी सरपंच कै. संभाजीराजे जाधव यांच्या घरामागे येतात. यावेळी गावातून जकराया महाराजांची पालखी या ठिकाणी येऊन तिन्ही पालख्यांच्या भेटीचा नयनरम्य सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थित पार पडला.
शुक्रवारी 7 एप्रिलरोजी तिन्ही देवतांसह गावातील देवतांना गोड नैवद्य दाखविण्यात येतो.या दिवशी कन्नड व मराठी धनगरी ओव्यांचा बहारदार कार्यक्रम जयकराया मंदिरात होणार आहे. सायंकाळी चार वाजता कुस्त्यांचा फड रंगणार आहे. तिसर्या दिवशी शनिवारी 8 एप्रिल रोजी तिन्ही पालख्या गावाच्या चावडीत येतात. यावेळी गावातील कलाकार विविध कला सादर करणार आहेत.
यावेळी जकराया देवस्थानचे आबासो पुजारी, बालाजी पुजारी,शाहीर जोतिबा कदम, गावचे सरपंच पोपट जाधव,जकराया देवस्थान कमिटी वसंत गुंड तसेच गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.