निशा हेगडे व पांडूरंग हेगडे हे दोघेजन मिळेल ते काम करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना यश वय 8 वर्षे व मुलगी सोनाली हे दोन मुले. दिनांक 21/04/2025 रोजी दोघा पती पत्नींना गोपाळपूर, येथील बबन शिरगिरे यांच्या शेतात मजूरीने काम मिळाले. दोघेजन आपल्या दोन्ही बछड्यांना घेवून शेतात कामासाठी गेले. परंतू उन्हाळ्याचे दिवस असल्याने पिण्याचे पाणी आवश्यक होते. पती व पत्नी दोघेजन कामात असल्याने त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना जवळच असणारे विटभट्टीवर पिण्यासाठी पाणी घेवून येण्यास पाठवले. परंतू पाणी फक्त सोनालीच घेवून आली. आई वडीलांना वाटले मुलगा तेथे मुलांसोबत खेळत असेल. म्हणून दोघांनी काम चालूच ठेवले.
परंतू मुलगा यश हा परत आला नाही म्हणून दोघांनी विटभट्टीवर जावून चौकशी केली असता मुलगा तेथे मिळून आला नाही. आत मात्र दोघांची पंचायत झाली त्यांनी विटभट्टीवर मुलाचा शोध घेतला, मुलगा मिळून येत नव्हता. शेवटी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्ेास येवून दोघांनी तक्रार नोंदवली.
मुलगा लहान असल्याने पंढरपूर तालुका पोलीस ठाणेचे श्री. मुजावर, पोलीस निरीक्षक यंानी तात्काळ यंत्रणा कामाला लावली.सर्वत्र मुलाची शोधा शोध केली. काही आशादायक माहिती मिळून येत नव्हती.पोलीस यंत्रणा हाताश झाली नाही.त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले...... त्यामध्ये मुलगा झोपडपट्टीकडे चालत जात असताना दिसला सर्व पोलीस मुलाचा फोटो दाखवत झोपडपट्टी पालथी घातली परंतू शोध लागणे. रात्र झाली परंतू यश मिळून येत नव्हता.
दिनांक 22/04/2025 रोजी पोनि मुजावर यांनी रात्रभर यश ला शोधण्यासाठी योजना आखली. दुसरे दिवशी स्वतः व निवडक अधिकारी व अंमलदार यांना कामाला लावले. अखेर पंढरपूरच्या चंद्रभागा नदीपात्रात नाव चालवणारे नावाडे यांचेकडे चौकशी करता या वर्णनाचा मुलगा महाद्वार घाटासमोरील मंदीराजवळ झोपला असल्याची माहिती मिळाली. सदर ठिकाणी पोलीसांनी मुलाच्या आई वडीलांसह जावून मुलाचा शोध घेतला तेथे मुलगा यश हा झोपत मिळून आला. तेव्हा कुठे पोलीस व आई वडीलांनी श्वास घेतला... आणि मुलगा यश याला झोपण्यासाठी आईची खुशी मिळाली आहे.
सदरची उत्कृष्ठ कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर,उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तयुब मुजावर, पंढरपूर तालुका पोलीस ठाणे व सहायक पोलीस निरीक्षक रेळेकर,व चालक नदाफ यांनी केली आहे.