सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठ आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघ , सोलापूर यांच्या संयुक्त विदयमाने ‘पत्रकारितेतील नवे प्रवाह’ या विषयावर दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेचे उदघाटन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांची उपस्थिती लाभणार आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ.मृणालिनी फडणवीस राहणार आहेत.
दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी ‘पत्रकारितेतील नवे प्रवाह’ या विषयावरील ही कार्यशाळा मंगळवेढेकर इन्स्टिट्युटच्या सभागृहात होणार आहे . या कार्यशाळेत ज्येष्ठ पत्रकार श्री. यदु जोशी ( मुंबई) हे मुद्रित माध्यमातील नव्या प्रवाहाबाबत , मयुरेश कोन्नूर ( मुंबई ) हे इलेक्ट्रॉनिक माध्यमातील नव्या प्रवाहबाबत तर, श्री. विश्वनाथ गरुड (पुणे) हे डिजिटल माध्यमातील नव्या प्रवाहाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा पत्रकार आणि पत्रकारितेचे विदयार्थी यांच्यासाठी खुली आहे. या कार्यशाळेत जास्तीत जास्त पत्रकार आणि पत्रकारितेच्या विदयार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे तसेच विदयापीठातील मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी केले आहे. या कार्यशाळेसाठी नाव नोंदणी करु इच्छिणा-यांनी ‘विदयापीठात डॉ. बाळासाहेब मागाडे ( 7972643230)) तर पत्रकार संघात प्रशांत कांबळे ( 8975838620) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.