सोलापूर : 365 दिवस महिला दिन साजरा करायला हवा .आई, बहिण ,पत्नी काय करते हे आपण सकाळी उठल्यापासून पहात असतो, असे प्रतिपादन डीवायएसपी सूर्यकांत पाटील यांनी पत्रकार संघाच्या महिला दिन कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले .मुलींवरील महिलांवरील अत्याचार सातत्याने वाढत आहेत आणि त्यासाठीच पोक्सो कायदा लागू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले .महिला पत्रकारांचे प्रमाण वाढले तर महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना लगेच वाचा फुटेल असे मत पाटील यांनी व्यक्त केले.सोलापूर शहरातील सात पोलिस स्टेशन्समध्ये दररोज किमान एक गुन्हा पळवून नेले, मुलगी गायब झाली अशा प्रकारचा गुन्हा दाखल होत असल्याचे पाटील यांनी सांगितले. पाटील यांच्या हस्ते सोलापुरातील महिला पत्रकारांचा रोप देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे पदाधिकारी व इतर पत्रकार उपस्थित होते.