सोलापूर : (समाधान रोकडे) : 8 मार्च उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले या गावात जागतिक महिला दिन वर्ष तिसरे गेल्या तीन वर्षापासून रानमसले गावांमध्ये जागतिक महिला दिन हा साजरा केला जातो रानमसले गावातील महिलांनी रानमसले गावाचा दुष्काळ हटवण्यासाठी कमरेला पदर खोचून गेल्या तीन वर्षापासून दुष्काळाशी लढा देत आहेत आणि गेल्या दोन वर्ष झाले पाणी फाउंडेशन मध्ये उत्तर सोलापूर तालुक्यात रानमसले गावचा द्वितीय क्रमांक आल्यामुळे सहा लाख रुपये बक्षीस मिळाले होतं त्या पैशाचा योग्य वापर व्हावा म्हणून आजचा मुहूर्त गाठून मार्च रोजी कॅनल वरून गाव तलावात पाईपलाईन याचे उद्घाटन गावातील वयोवृद्ध महिलांच्या हस्ते केले आहे. तसेच रानमसले गावच्या महिलांचा उत्साह बघून मोहोळ विधानसभेचे आमदार यशवंत माने यांनी 100 के.वी.चा डेपो देखील मंजूर केला आणि तो देखील आज गावात बसवण्यात देखील आला.