सोलापूर : सोलापूर जिल्ह्यासह, राज्यात,देशात छाती आणि गर्भाशयाच्या कॅन्सरच्या रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. किरकोळ आजार म्हणून आपण प्रथमता त्याकडे दुर्लक्ष करतो मात्र हा आजार कधी रौद्ररूप धारण करतो याचा अंदाज येत नाही जेव्हा कळतं तेव्हा सर्वस्व संपलेला असतो त्यामुळे महिलांनी छाती आणि गर्भाशयाच्या कॅन्सर बाबत जागरूक असणे गरजेचे असल्याचे मत सहारा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन अकलूजच्या डॉ. श्रद्धा जवंजाळ यांनी व्यक्त केले.
मोहोळ तालुक्यातील शिरापुर ( सो) येथे छाती व गर्भाशयाच्या कॅन्सरवरती आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात डॉ. जवंजाळ या बोलत होत्या. सदर कार्यक्रमाचे आयोजन शिरापूर येथील हनुमान मंदिरात ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण, चंद्रकांत देवकते व ग्रामपंचायत शिरपूरच्यावतीने करण्यात आले होते.
पुढे बोलताना डॉक्टर जवंजाळ म्हणाल्या की, महिलांना होणारा आजार म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर .या आजारामुळे अनेक महिलांना आपले शारीरिक स्वास्थ्य गमावाववे लागते. गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर वरती सध्या लस उपलब्ध आहे. ही लस नववर्षापासून सोळा वर्षाच्या मुलीने घेतली तर तिला उभ्या आयुष्यामध्ये गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर होण्याची शक्यता ९९% कमी होते .सोळा वर्षापासून पुढील वयाच्या महिलांना हे इंजेक्शन दिल्यानंतर सहा महिन्यांनी परत एकदा हा डोस त्यांना द्यावा लागतो, परंतु त्याआधी त्यांना (pepsmear screening)ही तपासणी करावी लागते. त्या तपासणीचे रिपोर्ट्स पाहून मग स्त्री रोग तज्ञाच्या सल्ल्याने त्यांना ही लस घेता येते.एकदा काही लस घेतली की महिलांचे जीवन आयुष्यभर सुखमय होते. आणि त्यांना आयुष्यात पुन्हा कॅन्सर होत नाही. अशी माहिती डॉक्टर जवंजाळ यांनी सांगितले.
या शिबिरात छत्रपती शिवाजी महाराज सर्वउपचार रुग्णालयाचे (सिव्हिल ) सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रभाकर गोवंडी, डॉ. पुरुषोत्तम होगार, यांनी महिलांचे आजार आणि त्यावरील उपचार या विषयावर माहिती सांगितली.
कार्यक्रमास शिरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. जिलानी खान डॉ. अपरा खान,ग्रामसेविका आम्रपाली भालशंकर, शिरापूरच्या सरपंच वृषाली सावंत , उपसरपंच सौदागर साठी, मुख्याध्यापक बी .जी.कुलकर्णी, ह. भ.प.बाळासाहेब हारदाडे महाराज , राहुल सर्वगोड, दीपाली पवार, सुरेखा मांरडकर, शामल धोत्रे, मुक्ता देवकते नीला मदने वंदना गोपने गिरिजा कोळेकर, लांबोटी आश्रम शाळेच्या स्नेहल कचरे, आधीसह जिल्हा परिषद शाळा शिरापूर, अंबिका विद्या मंदिर व लांबोटी आश्रम प्रशालेच्या पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चंद्रकांत देवकते यांनी केले तर आभार सुजाता राजेपांढरे यांनी मानले.