सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेमधील माजी सहाय्यक मुख्याधिकारी आणि सध्या लातूर येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले प्रभू जाधव यांच्या पत्नी स्नेहलता यांनी सोलापुरात गळफास घेऊन आत्महत्या केली. स्नेहलता या लातूरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी प्रभू जाधव यांच्या पत्नी होत्या. स्नेहलता यांनी हॉटेलच्या रुममध्ये साडीने गळफास घेऊन आयुष्य संपवलं.
मुलाच्या लग्नाच्या बस्त्याची खरेदी
स्नेहलता प्रभू जाधव यांच्या मुलाचे 18 डिसेंबर रोजी लग्न आहे. लग्नच्या बस्त्याच्या खरेदीसाठी प्रभू जाधव आणि स्नेहलता जाधव हे कर्नाटकातील चडचण येथे गेले होते. शनिवारी (26 नोव्हेंबर) रात्री उशीर झाल्याने ते दोघे सोलापुरातील सोरेगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होते. रविवारी सकाळी प्रभू जाधव हे कामानिमीत्त लातूरला गेले.