सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीची तसेच परिवहन समितीच्या सभापतीची निवडणूक येत्या शुक्रवारी होणार आहे त्यामुळे महापौर पदाचा पेक्षाही महत्वाचे समजले जाणारे स्थायी समिती सभापती पद कोणाला मिळणार याकडे इंद्रभुवनाचे लक्ष लागले आहे. स्थायी समिती मध्ये एकूण 16 नगरसेवकांचा समावेश आहे या समितीमध्ये भाजपचे आठ आणि विरोधकांची सर्व मिळून आठ असे पक्षीय बलाबल आहे.
त्यामुळे भाजप एक नगरसेवकाला फोडाफोडी करून आपला सभापती करणार की विरोधकांची खेळी यशस्वी ठरणार हे येत्या शुक्रवारी समजणार आहे भाजपकडून राजश्री कणके आणि अंबिका पाटील यांची नावे आघाडीवर आहेत तर काँग्रेसकडून परविन इनामदार आणि वैष्णवी करगुळे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे परिवहन समितीमध्ये 12 सदस्य आहेत परिवहन ची परिस्थिती अत्यंत बिकट आहे त्यामुळे या परिवहन समितीची स्टेरिंग कोणाच्या हाती मिळणार हे देखील शुक्रवारी समजणार आहे.