सोलापूर : आवसे वस्ती येथील अमराई येथील बरगंडे सायकल दुकानाशेजारी घराजवळ थांबले असताना धक्काबुक्की करून मारहाण केल्याची फिर्याद बालाजी शिवाजी माने याने केली आहे. मल्लू हराळे, नितीन माने, किशोर हराळे, माळप्पा हराळे या चौघांनी शिवीगाळ करून लोखंडी रॉडने व काठीने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक हार अधिक तपास करीत आहेत.