संजय राऊत म्हणाले की, 56 इंचाची छाती घेऊन अमेरिकेला गेले, मात्र त्या छातीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी टाचणी टोचली आणि ती लहान करून इकडे परत आले. ते म्हणाले की, दिल्ली असेल, प्रयागराज असेल, कुंभच्या नावाखाली हिंदू तुडवला जात आहे, कुठे आहे सरकार? अशी विचारणा सुद्धा संजय राऊत यांनी केली. इथं पाप करत आहात असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
ते पुढे म्हणाले की शिखांची पगडी उतरवण्यात आली. काय करत आहे भाजप? हा अपमान भाजपला वाटत नाही का? अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली. दिल्लीतील 84 दंगलीवर बोलत आहात चांगली गोष्ट आहे, मात्र हा तुम्हाला अपमान वाटत नाही का? असे ते म्हणाले. आमच्याच भूमीमध्ये बेड्या घातल्या गेल्या असे येते यावेळी म्हणाले.