सोलापूर : रब्बीच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खरीप क्षेत्र वाढल्याने सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने उभारले. सोलापूरचे कारखानदार खूप नशिबवान असून त्यांच्याविरूद्ध शेतकरी आंदोलन करीत नाही. पण, सर्वाधिक वजनात काटामारी आणि रिकव्हरी चोरी राज्यात कुठे होत असेल तर ती सोलापूर जिल्ह्यात होते, असा आरोप गंभीर माजी राज्यमंत्री रयतक्रांती शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
सदाभाऊ खोत रविवारी (ता. १२) ऊसाच्या एफआरपीसंदर्भात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी दिपक भोसले उपस्थित होते. खोत पुढे म्हणाले, १९८० च्या दशकात शरद जोशी यांनी शेतकऱ्यांना हक्कासाठी बोलायला व लढायला शिकवले. पण, शेतकऱ्यांना लुटणाऱ्या मुठभर लोकांना बळीराजाची प्रगती नको आहे. काँग्रेसचे नेत राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रा काढली. ती सर्वसामान्यांसाठी नव्हे तर स्वतःच्या पक्षासाठीच होती, असेही खोत यांनी यावेळी स्पष्ट केले. उद्योगपती अदानी यांच्याबद्दल बोलतानाही त्यांनी सांगितले की, शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात शेतकऱ्यांचे नाही पण अदानींचे कौतूक करण्यात आले आहे. आता तेच लोक अदानींबद्दल बोलत आहेत. ती भूमिका विरोधकांची असल्याचेही ते म्हणाले. शेवटी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांवरही टिका केली. पक्ष विसरून कारखानदारांकडून शेतकऱ्यांची लूट
माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदार पक्ष विसरून ‘चोर चोर मावस भाऊ अन् अर्धे अर्धे वाटून खाऊ’ या भूमिकेतून शेतकऱ्यांना लूटत आहेत. येथील शेतकरी कारखानदारांना त्रास देत नाही आणि त्यांना लगेच पैसे पण लागत नाहीत. त्यामुळे सोलापूरचे कारखानदार नशिबवान आहेत. कोल्हापूर, सांगलीप्रमाणे सोलापूरचे कारखाने एफआरपी देत नाहीत. त्याविरूद्ध आंदोलन उभे करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट कोल्हापूर, सांगलीप्रमाणे सोलापूरचे कारखाने एफआरपी देत नाहीत. त्याविरूद्ध आंदोलन उभे करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात राज्य सरकारमधील मंत्री, माजी मंत्री व भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे कारखाने आहेत. खोत यांच्या आरोपांमुळे आता त्या नेत्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.