सोलापूर : शंकरलिग कुंभार (प्रतिनीधी): दि. 2 डिसेंबर -शेगाव (ता.अक्कलकोट) येथे आठवडा बाजाराचा शुभारंभ बुधवारी दि. 2 डिसेंबर रोजी करण्यात आला. या आठवडी बाजारामध्ये फळे-भाजीपाला, भुसार माल, कपडे, मसाल्याचे पदार्थ व अन्य जीवना उपयोगी साहित्य या आठवडी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. मागील अनेक वर्षापासून शेगाव येथे आठवडी बाजार सुरू कराव्यात अशा प्रकारची मागणी गावकऱ्यांमध्ये होती. आठवडा बाजारासाठी शेगाव येथील नागरिकांना तडवळ, सुलेरजवळगे, करजगी, पानमंगरूळ, हलसंगी यासारख्या गावांना जावे लागत होते. आता गावातच आठवडा बाजार सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपला भाजीपाला गावातच विकण्याबरोबरच गावातील लोकांना गावातच भाजीपालासह अन्य साहित्य खरेदीसाठी उपलब्ध झाली आहे. मागील काही वर्षापासून दर शनिवारी कपडे आणि मसाल्याच्या पदार्थाची विक्री होत होती. परंतु बुधवार 12 डिसेंबर पासून आठवडा बाजार सुरू झाला असून सकाळी आठ वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत हा आठवडा बाजार सुरू राहणार आहे. या आठवडा बाजाराचा शेतकरी व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शेगाव ग्रामस्थांनी केला आहे. यावेळी मल्लिकार्जुन पाटील सिद्धप्पा झळकी, शांतप्पा कामाटी,यशवंत पाटील, श्रीशैल बिराजदार,बसन्ना जेऊरे, अर्जुन कोळी, इरप्पा बिराजदार,आनंदप्पा बिराजदार, निंगन्ना ख्यादगे यांच्यासह आदी उपस्थित होते.