सोलापूर : जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती दिनानिमित्त महापालिकेच्या वीरशैव सेवक सेवा संघाच्या वतीने आज महापालिकेत विविध कामासाठी येणाऱ्या लोकांसाठी वॉटर कुलर बसविण्यात आले असून त्याचे उद्घाटन महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांच्या शुभहस्ते तर उपायुक्त धनराज पांडे,माजी महापौर शोभाताई बनशेट्टी,माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, माजी नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, नगर अभियंता संदीप कारंजे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक सेवक संघाचे अध्यक्ष केदारनाथ गोटे यांनी केले.
वीरशैव सेवक संघ 2017 पासून महात्मा बसवेश्वर जयंती साजरा करत असून गेल्यावर्षी जगत ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त महानगरपालिकेच्या शाळेतील 21 गरीब मुला-मुलींना शाळेचे ड्रेस, वह्या व शालेय साहित्य वाटप करण्यात आले.सेवक संघाच्या दुसऱ्या वर्षी सैनिकी निधी म्हणून 51 हजार रुपये देण्यात आले. त्याचबरोबर कोरोनाच्या काळामध्ये दोन वर्षात गरीब लोकांना गहू, तांदूळ, साखर, चहापत्ती असे पाच किलोचे किट तयार करून वाटप करण्यात आले.असे प्रास्ताविकातून अध्यक्ष केदारनाथ गोटे यांनी माहिती दिली. महापालिकेच्या आवारामध्ये लोकांची नेहमी काम निमित्ताने गर्दी होत असते. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून आज महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त वॉटर कुलरची व्यवस्था केल्याबद्दल महापालिकेचे आयुक्त पि. शिवशंकर यांनी वीरशैव सेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांना अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच शहरवासियांना महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.वीरशैव सेवक संघाच्या वतीने महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात हे एक स्तुत्य उपक्रम असून पुढील काळातही असेच उपक्रम राबवावे असे मत आयुक्त पि.शिवशंकर यांनी व्यक्त केले.
यावेळी वीरशैव सेवक सेवक संघाचे अध्यक्ष केदारनाथ गोटे सचिव अशोक बिराजदार, खजिनदार संजय सावळगी, उपाध्यक्ष नागेश धरणे,प्रसिद्धीप्रमुख श्री गणेश बिराजदार,मल्लिनाथ धरणे,मल्लिनाथ हुंजे, राजू शिवशंपी, रवी बिद्री, श्रीशेल हिंगमिरेझ विनायक आवटे, रमेश लिगडे, महादेव काडगावकर, अन्नपूर्णा स्वामी, बाळू कोरे, नागेश धरणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभुलिंग पुजारी यांनी केले. तर आभार प्रदर्शन अशोक बिराजदार यांनी मानले.