येस न्युज मराठी नेटवर्क : शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या मुंबई येथील सिल्वर ओक घरासमोर एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आलं होतं या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी पवारांच्या घरावर हल्ला देखील केला होता. मात्र या हल्लाची कल्पना आधीच पोलिसांच्या विशेष शाखेद्वारे पोलिसांना देण्यात आली होती अशी माहिती समोर आली आहे.
याबाबतच पत्र ४ एप्रिल रोजी गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त राजीव जैन यांनी विश्वास नागंरे पाटलांना दिली होती. अशी माहिती आता समोर आली आहे. या पत्रात सिल्वर ओक, वर्षा, मातोश्री, परिवहन मंत्र्यांचा बंगला इथे आंदोलक आंदोलन करू शकतात असा उल्लेख करण्यात आला आहे. तर पाच एप्रिल सिल्वर ओक आणि मातोश्री बंगल्यावर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. तसंच यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असाही या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आला आहे.