येस न्युज मराठी नेटवर्क : माझी पालिका, माझी जबाबदारी या हेतूने प्रेरित होवून मनपा प्रभाग 7 मधील विरोधी पक्षनेते अमोल शिंदे आणि नगरसेविका सारिका अनिकेत पिसे यांनी २५ लाखांचा निधी सध्याच्या कोरोनो महामारी रोखण्यासाठी मनपा प्रशासनाकडे वर्ग केला आहे. दिवसागणिक कोरोनोचा प्रादुर्भाव वाढत आहे, यात घरातील बुजुर्ग, कर्ती आणि हातास आलेली माणसं बळी पडत आहेत. ते रोखण्यासाठी एक कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी म्हणून विरोधी पक्षनेते अमोल शिंदे आणि नगरसेविका सौ सारिकाताई अनिकेत पिसे यांनी आपला वार्ड विकास निधी अद्ययावत रुग्णवाहिका आणि व्हेंटिलेटर खरेदीसाठी वर्ग केले आहेत. मागील वर्षभरापासून कोरोनो विषयक जनजागृती करत ही महामारी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.अशी माहिती महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी दिली.