सोलापूर दि. 31 (जिमाका) :- जिल्ह्यात दिनांक एक ते सात ऑगस्ट 2023 या कालावधीत मोठ्या प्रमाणावर महसूल सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे महसूल सप्ताह सोबतच
दि. 1 जाने,2024 च्या अर्हता दिनांकावर मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम अंतर्गत जास्तीत जास्त मतदार नोंदणी, दुरुस्ती व मतदार जन जागृती कार्यक्रम घेण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त मतदारांनी मतदार म्हणून नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.
महसूल विभागामार्फत राज्यात दि. 1 ऑग, 2023 रोजी महसूल दिन साजरा केला जातो. या दिनापासून शासनाने राज्यात महसूल सप्ताह साजरा करणेचे आदेशित केले आहे. त्यास अनुसरुन राज्याचे अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी यांनी राज्यात दि. 1 जाने,2024 च्या अर्हता दिनांकावर मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम दि. 1 जून, 2023 पासून दि. 5 जाने 2024 अखेर आयोजित केला आहे. या कार्यक्रमातंर्गत आयोगाने वेगवेगळ्या तारखांना विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात महसूल सप्ताहा सोबत मतदार जनजागृती व मतदार यादी पुर्नरिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करुन जास्तीत जास्त मतदार नोंदणी, दुरुस्ती व मतदार जन जागृती करणे बाबत खालीलप्रमाणे नियोजन करण्यात आलेले आहे.
दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी महसूल दिन साजरा करणे व महसूल दिनाचा शुभारंभ – सर्व तहसिल कार्यायात मतदार जन जागृतीसाठी एक विशेष कक्ष संपूर्ण सात दिवसासाठी स्थापन करणे त्यामध्ये मा.आयोगाकडील सूचनांचे फलक प्रदर्शित करणे व यास प्रसिध्दी देणे.
दिनांक 2 ऑगस्ट 2023 युवा संवाद – सर्व जिल्हयातील महाविद्यालयामध्ये विशेष मोहिमेचे आयोजन करुन मतदारांची नोंदणी करुन घेणे. यासाठी जिल्हयातील आयकॉन यांची मदत घेणे.
दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी एक हात मदतीचा- दिव्यांग मतदार तृतीयंपथी मतदार देह विक्रिय मतदार तसेच समाजतील सर्व वंचित घटक यांच्य्या मतदार नोंदणीसाठी त्यांच्या राहत्या ठिकाणी विशेषबाब म्हणून बी.एल.ओ. यांचे एक पथक पाठवून मतदार नोंदणी करुन घेणे.
दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी जनसंवाद- सर्व ग्रामपंचायत स्तरावर व शहरी भागात प्रभागस्तरावर मतदार यांदीचे वाचन करणे. मतदार यादी अद्ययावत करण्याची कार्यवाही करणे तसेच मतदारनाचा टक्का वाढविणे कामी मतदारांमध्ये जनजागृती करणे.
दिनांक 5 ऑगस्ट 2023 रोजी सैनिक हो तुमच्य्यासाठी – सैनिक मतदार यांच्या नोंदी अद्यावत करणे. सैनिक कुटुंबाशी संवाद साधून मतदार नोंदणी अद्ययावत करणे.
दिनांक 6 ऑगस्ट 2023 रोजी महसूल संवर्गातील कार्यरत / सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद- महसूल संवर्गातील कार्यरत / सेवा निवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या यादी अद्यावत करणे.
दिनांक 7 ऑगस्ट 2023 रोजी महसूल सप्ताह सांगता समारंभ – यानिमित्ताने मतदार जनजागृती करण्याकरिता सर्व मोठया शहरात मंडळस्तरावर,तहसिलस्तरावर, सर्व महाविद्यालय, खाजगी विद्यालय यांच्या सहकार्याने मोठया प्रमाणात पद यात्रेचे आयोजन करावे.