येस न्युज नेटवर्क : कुस्तीपटू आणि काँग्रेसच्या उमेदवार विनेश फोगाट हिने हरियाणातील जुलाना विधानसभेतून बाजी मारली आहे. विनेश फोगाटने भाजपचे उमेदवार कॅप्टन योगेश बैरागी यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. 6015 मतांनी विनेश फोगाटने भाजपच्या योगेश बैरागी यांचा पराभव केला आहे.
जुलाना मतदारसंघात विनेश फोगाट आणि योगेश बैरागी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. पहिल्या चार फेऱ्यांमध्ये विनेश फोगाट योगेश बैरागी यांच्यापेक्षा पिछाडीवर होती. पण पुढील सर्व मतमोजणीच्या फेरीत विनेश फोगाट आघाडीवर राहिली आणि विजयी झाली. दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीपूर्वी अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटने निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतर 6 सप्टेंबरला विनेशने ऑलिम्पिक कुस्तीपटू बजरंग पुनियासोबत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानंतर काँग्रेसने जुलानामधून विनेश फोगाटला तिकीट दिली.
विनेश फोगाटला किती मते मिळाली?
विनेश फोगाटला जुलाना येथील जनतेने पाठिंबा दिला असून तिला एकूण 65080 मते मिळाली आहेत. तर प्रतिस्पर्धी कॅप्टन सिंग वैरागी यांना 59065 मतांवर समाधान मानावे लागले आणि ते दुसऱ्या स्थानावर राहिले. त्याचवेळी आम आदमी पक्षाच्या उमेदवार कविता राणी यांना केवळ 1280 मते मिळाली.