ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले तब्येत खालावल्याने रुग्णालयात दाखल

0
16

पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या तब्येतीविषयीची महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या 15 दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल आहेत. मात्र आता त्यांची तब्येत खालावल्याचं कळतंय.

विक्रम गोखले हे रंगभूमी, टेलिव्हिजन आणि चित्रपट अशा सर्व व्यासपीठांवरील अत्यंत नावाजलेले कलाकार आहेत. रंगभूमीवर त्यांनी एक मोठा काळ गाजवला आहे. मराठीसोबतच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही नाव कमावलंय. सध्या ते स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत भूमिका साकारत आहेत. काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय मालिका ‘अग्निहोत्र’मध्ये त्यांनी साकारलेली मोरेश्वर अग्निहोत्री ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.