सोलापूर – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्त येथील सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे दरवर्षी प्रमाणे आयोजित खुल्या गटाची क्रिकेट स्पर्धा “विजय चषक २०२५” चे उद्घाटन आज रोजी सोलापूरचे प्रसिद्ध इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर दयानंद कॉलेज चे माजी प्राचार्य विजयकुमार उबाळे सरांच्या हस्ते आणि जिल्हा संघटनेचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
जिल्हा क्रिकेट संघटनेचे माननीय चेअरमन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील तसेच संयुक्त सचिव खासदार धैर्यशील भैय्या मोहिते पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तसेच अकलूज च्या ग्रीन फ्रिंगर्स स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ही क्रिकेट स्पर्धा दरवर्षी भरविण्यात येत असून जिल्हा संघटनेची अधिकृत स्पर्धा असल्याने जिल्ह्यातील नामवंत क्लब, संघ या स्पर्धेत खेळतात. लेदर बॉल वरील ही स्पर्धा यावर्षी एकदिवसीय सामने ह्या स्वरूपात खेळविण्यात येणार आहे.
उद्घाटन प्रसंगी सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे तथा माजी सचिव,MCA आजीवन सदस्य दिलीप बचुवार यांचेसह सध्याचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बर्सु, उदय डोके, संजय बडवे, संजय वडजे, सुनील मालप, संजय मोरे, उमेश मामड्याल, MCA महिला निवड समिती प्रमुख स्नेहल जाधव, किरण सोनी मनीहार, MCA गुणलेखक मिलिंद गोरे, प्रसाद शावंतुल, ऋत्विक चव्हाण, चिराग शहा, दत्ता बडगु आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने उबाळे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला.